मार्क्सबाबा बरोबर म्हणतो!
गरजा या दोनच प्रकारच्या. एक म्हणजे नैसर्गिक आणि खरया गरजा. आणि दुसऱ्या प्रकारच्या गरजा म्हणजे कृत्रिम. माणसाने मानसांसाठी तयार केलेल्या. आज जाहिरातींचा प्रचंड भरिमाड करुन उत्पादक वर्गाने प्रत्येक माणसाच्या एकंदर गरजा वाढविल्या. थोडक्यात काय तर कृत्रिम गरजाच वाढवल्या. काही ख़ास आवश्यकता नसताना या वस्तुं बद्दल निर्माण झालेलेल्या ओढ़ीने माणूस अधिक अधिक गरीब होत गेला किंवा स्वतःला गरीब मानु लागला!
माझ्याही बाबतीत हेच घडले. एका मैत्रनिच्या रुपात माझ्य आयुष्यात 'ती'ने आधी प्रवेश केला आणि नंतर तीच्या प्रेमळ, समंजस स्वभावाने, तिची 'कृत्रिम' गरज माझ्या मानत निर्माण केली.
आज ती जवळ पास कुठेच नाही. पण ती कृत्रिम गरज मात्र मला अधिक अधिक त्रास देते. तिच्या गरजेने मला अधिकच गरीब करुन सोडले!
ह्यात तीचा तरी कसला दोष? मीच ही कृत्रिम गरज माझ्या वर लादून घेतली. हेच खरे!
बर झाल मार्क्स भेटला! आता बरं वाटतय.
No comments:
Post a Comment