चंद्र
'ती' आणि मी.
सागरी किनारा.
आकाशात निघालेली चंद्रकोर
समुद्रलाही आलालेली भरती...
मग काय.. मूड रोमांटिक होणारच !
'ही'ला थोड आणखीच जवळ ओढून,
माझ्यातल्या 'कवी'ला थोड जागवून,
चंद्राच्या सौंदर्यावर कही बोलणार...
तोच,
तोच एका फेरीवाल्या लहान मुलाने जवळ येउन विचारले...
" गरम गरम चने घेता का?"
मीही त्याला मिश्किलपणे विचारले
"अरे तुला तो चन्द्र पाहून काय वाटत?"
"ताटात उष्टी टाकलेली इडली" तो उत्तरला !
No comments:
Post a Comment