लव लेटर
ती मझ्या वर्गात होती. मला आवडायची. पण हे तीला सांगायची कधी हिम्मतच झाली नाही.
मी माझ्या भावना माझ्या पर्यंतच ठेवल्या. कुणाला कलू दिल्या नाहीत पण त्यांना शब्दांत गुंफून कागदावर मात्र मांडून ठेवयाचो. त्यात नाव नसायचे. असायच्या त्या फ़क्त भावना. जणू काही ती माझी प्रेम पत्रेच होती. एखाद्या बोरिंग क्लास मधे तीच्या कड़े चोरून बघत कागदावर शब्द मांडने हां माझा आवडता छंद होता.
एके दिवशी तीने मला माझे गणिताचे नोटबुक मागितले. मीही अगदी सहज तीला दिले. नन्तर उमजले अरे, त्यात तर मी दूसरीही बरीच गणिते मांडून ठेवली आहेत. तीच्याच साठी लिहलेली 'प्रेम पत्रेच' त्यात होती. माझी छाती जोरात धड धडायला लागली. दुसरे एक मन संगत होते, जाउदे चांगलेच झाले की. काय तो एकदाचा सोक्ष-मोक्ष तरी लगेल. एक तर हो म्हणेल किवा नाही. नाही म्हटले तर मग? तर मग सारा the End होणार होता.
मी घरी आलो. कसबस जेवण उरकल. झोपतर पार उडून गेली होती.आणि ती रात्रही फार मोठी वाटत होती.
दुसरया दिवशी सकाळीच धड धड्त्या छातिनेच मी तिला गाठले. तीही बहुतेक मलाच शोधत होती. तीच्या हातात माझ नोटबुक होत.
ती माझ्या जवळ आली. अगदी माझ्या डोळ्यात बघून म्हणाली, .
" तू कविता फार छान लिहातोस रे"
"गुड! लिहत जा की"
आणि 'ती' आपल्या निरागस हस्या समेत निघून गेली !
No comments:
Post a Comment