Friday, March 18, 2011

बर झाल मार्क्स भेटला!



मार्क्सबाबा बरोबर म्हणतो! 

गरजा या दोनच प्रकारच्या. एक म्हणजे नैसर्गिक आणि खरया गरजा. आणि दुसऱ्या प्रकारच्या  गरजा म्हणजे कृत्रिम. माणसाने मानसांसाठी तयार केलेल्या. आज जाहिरातींचा प्रचंड भरिमाड करुन उत्पादक वर्गाने प्रत्येक माणसाच्या एकंदर गरजा वाढविल्या. थोडक्यात काय तर कृत्रिम गरजाच वाढवल्या. काही ख़ास आवश्यकता नसताना या वस्तुं बद्दल निर्माण झालेलेल्या ओढ़ीने माणूस अधिक अधिक गरीब होत गेला किंवा स्वतःला गरीब मानु लागला!

माझ्याही बाबतीत हेच घडले. एका मैत्रनिच्या रुपात माझ्य आयुष्यात 'ती'ने आधी प्रवेश केला आणि नंतर तीच्या प्रेमळ, समंजस स्वभावाने,  तिची 'कृत्रिम' गरज माझ्या मानत निर्माण केली.

आज ती जवळ पास कुठेच नाही. पण ती कृत्रिम गरज मात्र मला अधिक अधिक त्रास देते. तिच्या गरजेने  मला अधिकच गरीब करुन सोडले!

ह्यात  तीचा तरी कसला दोष? मीच ही कृत्रिम गरज माझ्या वर लादून घेतली. हेच खरे!

बर झाल मार्क्स भेटला! आता बरं वाटतय.





Wednesday, March 16, 2011

लव लेटर

                            लव लेटर

ती मझ्या वर्गात होती. मला आवडायची. पण हे तीला सांगायची कधी हिम्मतच झाली नाही. 

मी माझ्या भावना माझ्या पर्यंतच ठेवल्या. कुणाला कलू दिल्या नाहीत पण  त्यांना शब्दांत गुंफून कागदावर मात्र मांडून ठेवयाचो. त्यात नाव नसायचे. असायच्या त्या फ़क्त भावना. जणू काही ती माझी प्रेम पत्रेच होती. एखाद्या बोरिंग क्लास मधे तीच्या कड़े चोरून बघत कागदावर शब्द मांडने हां माझा आवडता छंद होता. 

एके दिवशी तीने मला माझे गणिताचे नोटबुक मागितले. मीही अगदी सहज तीला दिले. नन्तर उमजले अरे, त्यात तर मी दूसरीही  बरीच गणिते मांडून ठेवली आहेत. तीच्याच साठी लिहलेली 'प्रेम पत्रेच' त्यात होती. माझी छाती जोरात धड धडायला लागली. दुसरे एक मन संगत होते, जाउदे चांगलेच झाले की. काय तो एकदाचा सोक्ष-मोक्ष तरी लगेल. एक तर हो म्हणेल किवा नाही. नाही म्हटले तर मग? तर मग सारा the End होणार होता. 

मी घरी आलो. कसबस जेवण उरकल. झोपतर  पार उडून गेली होती.आणि  ती रात्रही  फार मोठी वाटत होती.

दुसरया दिवशी सकाळीच धड धड्त्या छातिनेच मी तिला गाठले. तीही बहुतेक मलाच शोधत होती. तीच्या हातात माझ नोटबुक होत. 

ती माझ्या जवळ आली. अगदी माझ्या डोळ्यात बघून म्हणाली,  .

    " तू कविता फार छान लिहातोस रे"  
    "गुड! लिहत जा की"

आणि  'ती' आपल्या निरागस हस्या समेत निघून गेली !