Saturday, April 23, 2011

'ऊर्जा'


'उर्जेचा तुटवडा असलेल्या राज्यात  
सत्तापक्षाने एक नवा कोरा 'ऊर्जा' प्रकल्प मांडला...

आणि राज्यात एक नवी 'ऊर्जा'  संचारली....

विरोधीपक्षात  कुजबुज सुरु झाली 
"चला बर झाल...
आम्ही तरी किती दिवस जून्या "प्रकाल्पवर" काम करायच?"

आणि दोघे ही आपापल्या 'प्रकाल्पावर' लागले !











Sunday, April 17, 2011

चंद्र

  चंद्र
   'ती' आणि  मी.                                                                                
   सागरी किनारा. 
   आकाशात निघालेली चंद्रकोर  
   समुद्रलाही आलालेली भरती...
   मग काय.. मूड रोमांटिक होणारच !

  'ही'ला थोड आणखीच जवळ ओढून, 
  माझ्यातल्या 'कवी'ला थोड जागवून,

  चंद्राच्या सौंदर्यावर कही बोलणार... 
  तोच,

   तोच एका फेरीवाल्या लहान मुलाने जवळ येउन    विचारले...
   " गरम गरम चने घेता का?"
    मीही त्याला मिश्किलपणे विचारले
   "अरे तुला तो चन्द्र पाहून काय वाटत?" 

  "ताटात उष्टी टाकलेली इडली" तो उत्तरला !