Friday, December 24, 2010

A Love Story


वैशाखाची एक सायंकाल. बाहर वादळी वातावरण. मी घरातील खिडक्या-दार बंद करायला उठालो.
तोच "ती" दारात उभी.
" मी आले " ती.
" तू खरच आलीस ?" मी.
एव्हाना, बाहेर काळ्या ढगांनी आकाश  झाकल होत. वारयाचाही जोर वाढला होता.
ती दोन पावले पुढे सरकली. माझ्या डोळ्यांत ती माझ्याच प्रश्नाचा " अर्थ " शोधू लागली होती.
मी नकळत मागे सरलो....
 त्या क्षणात मागच सार काही डोळ्यान समोर फिरू लागल.....
आमची पहिली भेट. ती कशी छान लाजली होती. आणि मग भेटी मागुन भेटी वाढू लगल्या. माझ्या  डोळ्यांतच तिला तिची सारी उत्तरे मिळायाची. मग ती माझ्या खांद्यावर डोक ठेउन अगदी निर्धास्त व्ह्यायाची. मी ही तीचा हात हाती घेउन निवांत बसायचो. ...
पण आज...
तीची नजर मला अगदी आत पर्यंत बोचत होती. माझे भेकड डोळे पार कोरडे पडले होते. त्यात किंचितही भावनांचा ओलावा  नह्वता. डोळ्यात 'कचरा' गेला, मी नजर चोरून डोळे चोलु लागलो.
तीही तशीच मागे फिरली. माझ्याही तोंडून नकली, बनावटी 'थांब' म्हणून शब्दही निघाला नाही. मला माहित होत की ती 
आता परत फिरणार नाही पण निदान हाक तर मारायची होती पण नाही जमले. 
तीला सारे " अर्थ " उमगले होते....तशी ती फार समजुतदार होतीच !
माझ्या घराचा उम्बराठा ओलांडून ती बाहेर पडली होती. तीच्या पाठ मोरया आकृति कड़े मी बघत राहिलो.
आणि पाउस सुरु झाला. माझ्या चौकटीत उभा राहून मी तिला बघू लागलो. मी हाक मारली.. "परत ये... पाउस फार जोराचा पडतोय" पण तोपर्यंत ती फार लांब निघून गेली होती. त्या मुसळधार पावसात ती कुठेच दिसत नव्हती.

पण हे सर्व आज का ? कालच तिच्या लग्नाची पत्रिका मिळाली  आणि ती वैशाखाची सायंकाल पुन्हा आठवली.....!







1 comment: